जनसंपर्क

सध्याच्या अत्याधुनिक डिजिटल युगात जनसंपर्काचं महत्व प्रत्येक ठिकाणी वाढलेलं आहे. शासन-प्रशासन उद्योग व्यापार शैक्षणिक आर्थिक औद्योगिक संस्कृती सहकार आरोग्य कृषी…  असते असे नाही जिथे जनसंपर्क आवश्यक होत नाही.  राजकारणासाठी तर जनसंपर्काची अत्यावश्यकता आहे आणि जनसंपर्क शिवाय राजकारण करतात येत नाही.  समाजकारण आणि पक्ष कारणसुद्धा जनसंपर्क पासून दूर नाही जनसंपर्कही सर्वांची एक गरज बनली आहे.

जनसंपर्क हे शास्त्र आहे.  ही कला आहे.   त्यासाठी कौशल्य आवश्यक आहे.  लोकांशी संपर्क करण्याची लोकांशी जुळवून घेण्याची वृत्ती सुद्धा आवश्यक आहे.

जगताना जनसंपर्काच्या क्षेत्रात यायचं आहे त्यांचा अभ्यास वाचन व्यासंग आणि जिज्ञासा हे फार मोठ्या प्रमाणात असला पाहिजे किंबहुना ते या सर्व गोष्टींनी झपाटलेले असले पाहिजेत.  आपल्या आजूबाजूच्या परिसरातील गावातील शहरातील राज्यातील आणि जगातही घडामोडीत संपूर्ण ज्ञान त्यांनी करून घेतला पाहिजे.  वाचकांना आवडेल अशी लेखनशैली सुद्धा आत्मसात केली पाहिजे.

जनसंपर्क म्हणजे केवळ लेखन नव्हे.  जनसंपर्क क्षेत्रातील व्यक्ती हे प्रभावी वक्ता सुद्धा असले पाहिजे आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बोलण्याची संभाषणाची शैली तयार केली पाहिजे. आपण वापरत असलेले शब्द वाक्य सुभाषित यांचा मोठा संग्रह  करण्याची आवड असली पाहिजे.  समाजातील प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तींना पारखून घेणे तसेच मित्र जोडण्याची क्षमता असली पाहिजेत कष्ट करण्याची तयारी असायला हवी संघटन कौशल्य असायला पाहिजे.  आपलं मत मांडताना इतरांची मते सुद्धा ऐकून घेण्याचा गुण असला पाहिजे.  इतरांच्या मतावर त्या प्रश्नांवर समर्पक उत्तर देऊन त्या व्यक्तीचे समाधान करण्याची कला आत्मसात केली पाहिजे.  हजरजबाबीपणा समयोचित निर्णय घेणे इत्यादी गुण आपल्यात अंगिकारले पाहिजे